पुणे – आधुनिक युगात मानसिक आरोग्य ही एक गंभीर आणि चिंताजनक बाब ठरत आहे. वाढता ताण, अस्थिर जीवनशैली आणि सततची स्पर्धा यामुळे अनेक जण विविध मानसिक विकारांना बळी पडत आहेत. शारीरिक आरोग्याकडे आपण लक्ष देतो, मात्र मन आजारी पडले तरी त्याकडे दुर्लक्ष केले जाते. ताण, भीती, फोबिया, नैराश्य (डिप्रेशन), झोप न लागणे, आत्मविश्वास कमी होणे, एकाग्रतेचा अभाव, स्मरणशक्तीच्या समस्या, स्किझोफ्रेनिया, ओसीडी (Obsessive Compulsive Disorder), आयबीएस (Irritable Bowel Syndrome), वैवाहिक तणाव तसेच मनोवैज्ञानिक लैंगिक समस्या या मानसिक विकारांमुळे व्यक्तीचे व्यक्तिगत तसेच सामाजिक आयुष्य विस्कळीत होते. मानसिक आरोग्य तपासण्यासाठी काही प्रश्न स्वतःला विचारणे उपयुक्त ठरते – सतत ताण व भीती जाणवते का? झोप नीट लागत नाही का? आत्मविश्वास कमी झाला आहे का? एकाग्रता व स्मरणशक्ती कमी होत आहे का? नातेसंबंधांमध्ये तणाव व वाद सतत होत आहेत का? या प्रश्नांची उत्तरे “होय” अशी येत असल्यास मानसिक