कराची, लाहोरच्या स्टेडिअमवर इतर सर्व देशांचे झेंडे, मात्र भारताचा भारताचा झेंडा गायब
चॅम्पिअन्स ट्रॉफीसाठी भारतीय संघ पाकिस्तानात खेळण्यास जाणार नसल्याने पाकिस्तानची प्रतिमा अधिकच खराब झाली आहे. या निर्णयामुळे पाकिस्तानला चांगल्याच मिरच्या झोंबल्या आहेत. भारतीय संघ पाकिस्तानात खेळला असता तर चांगलीच कमाई झाली असती. ही कमाई बुडाल्या मुळे हा द्वेषपूर्ण निर्णय पाकिस्तानने घेतला.
भारत हे सर्व सामने दुबईमध्ये खेळणार आहे. यामुळे पाकिस्तानने भारताचा झेंडा लावलेला नाही. पाकिस्तानमध्ये अजून काही स्टेडिअमचे काम पूर्ण झाले नाही. याचेही व्हिडीओ सोशल मिडीयावर दिसत आहेत. पाकिस्तानात फक्त पहिल्या फेरीतील सामनेच घेतले जाणार आहेत मात्र भारताचे सर्व सामने दुबईत होणार आहेत. भारताने सुरक्षाच्या कारणाने पाकिस्तानात खेळण्यास नकार दिला आहे.
भारतीय संघाशिवाय या स्पर्धेला काही अर्थ नाही हे आयसीसीला चांगलेच माहिती आहे. यामुळे आयसीसीने हायब्रिड मॉडेलमध्ये ही स्पर्धा खेळण्याचा निर्णय घेतला होता. भारतीय संघ सेमीफायनलमध्ये गेला तरी सुद्धा सामने हे दुबईला होणार आहेत. यामुळे पाकिस्तानची आगपाखड होत आहे.
या सामन्याचे यजमानपद पाकिस्तानकडे आहे मात्र सेमी आणि फायनल जर देशाबाहेर होत असेल तर असे यजमानपदाला नावालाच उरते असा सवाल क्रिकेटजगतात उपस्थित केला जात आहे. यावरूनही पाकिस्तानची नाचक्की होत आहे. यामुळे पाकिस्तान भारताचा झेंडा न लाऊन आपला राग व्यक्त करत आहे. .
आयसीसी आणि पाकिस्तानच्या पीसीबीमध्ये असा करार झाला आहे की पाकिस्तान देखील भारतात ज्या आयसीसीच्या स्पर्धा असतील त्या भारतात खेळणार नाही. यामुळे या दोन्ही देशांचे शत्रूत्व जगासमोर सतत उघड होत राहणार.
