“द बॉलीवुड स्टॅम्प जर्नी” पुस्तकाचा भव्य प्रकाशन सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला
“द बॉलीवुड स्टॅम्प जर्नी” पुस्तकाचा भव्य प्रकाशन सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला
पुणे दिनांक 10 ऑगस्ट 2025 पुणे – “द बॉलीवुड स्टॅम्प जर्नी” या बहुप्रतिक्षित पुस्तकाचा प्रकाशन सोहळा फिल्म एंड टेलिविजन इंस्टिट्यूट मध्ये मोठ्या दिमाखात पार पडला. या प्रेरणादायी पुस्तकाचे लेखक संदीप बोयत यांनी भारतीय चित्रपटसृष्टीतील अनेक चित्रपट विषय टपाल तिकीट अज्ञात आणि प्रेरणादायी कहाण्यांना शब्दबद्ध केले आहे. या कार्यक्रमाचे उत्कृष्ट सूत्रसंचालन पूजा निकुंभ यांनी केले, आपल्या सादरीकरणाने प्रेक्षकांची मनं जिंकली. प्रसिद्ध प्रोफेशनल सिंगर अभिजीत भारद्वाज यांनी आपल्या सुरेल आवाजाने संपूर्ण सभागृह मंत्रमुग्ध केले. या प्रसंगी अनेक मान्यवर उपस्थित होते. प्रमुख पाहुणे म्हणून एफटीआयआय (FTII) ची रेडिओ जॉकी नीता तुपारे आणि आर.जे. संजय हिरवे यांनी कार्यक्रमाची शोभा वाढवली. तसेच प्रमुख पाहुणे सुभाष लोधा (सिद्धी फाउंडेशन अध्यक्ष अभिनेता) समीर खिरीड आणि इतर अनेक विशिष्ट व्यक्ती उपस्थित होत्या. या कार्यक्रमाचे मुख्य प्रायोजक ओम नंदा होते, तर कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाची जबाबदारी इव्हेंट मॅनेजर प्रीती शर्मा यांनी पार पाडली. फॅशन क्षेत्रातूनही अनेक नामांकित व्यक्ती कार्यक्रमात सहभागी झाल्या, त्यामध्ये सोनाली पिंगले (फॅशन मॉडेल), जैस्मिन भाबूर (फॅशन मॉडेल), वैभव वाघमारे स्नेहल ठकार (फॅशन मॉडेल), श्वेता निकभं, देवेंद्र शर्मा, देशसेवेत योगदान दिलेले कारगिल युद्धाचे सहभागी माजी सैनिक अशोक जाधव आणि माजी सैनिक शशिकांत तावडे यांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाला एक वेगळेच गौरवाचे रूप मिळाले. मनोरंजन सृष्टीतून अभिनेता बाऴासाहेब भालेराव आणि सुरेश डोळस यांनी आपल्या उपस्थितीने कार्यक्रमात रंग भरले. या कार्यक्रमाचा उद्देश केवळ “द बॉलीवुड स्टॅम्प जर्नी” या पुस्तकाचे प्रकाशन एवढाच नव्हता, तर भारतीय चित्रपटसृष्टीत होणाऱ्या सर्जनशील कार्यांना प्रोत्साहन देणे हा देखील होता. हा सोहळा हे सिद्ध करतो की, सिनेमा, साहित्य, संगीत कला क्षेत्र जेव्हा एका मंचावर एकत्र येतात, तेव्हा कार्यक्रम अविस्मरणीय ठरतो
