मराठी चित्रपटसृष्टीतील दमदार अभिनेता रमेश परदेशी आपल्या चाहत्यांसाठी एक नवा धमाका घेऊन येत आहे. त्यांचा आगामी चित्रपट ‘शातीर: दि बिगिनिंग’ २३ मे २०२५ रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात रमेश परदेशी PSI श्रीकांत देशमुख या मुख्य भूमिकेत झळकणार असून, त्यांच्या हटके लुक आणि पोलिसी अदा यामुळे चित्रपटाबद्दल प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे.
‘शातीर: दि बिगिनिंग’ हा चित्रपट Shreeyans Arts & Motion Pictures या निर्मितीसंस्थेअंतर्गत तयार झाला आहे. चित्रपटाची पोस्टर, टीझर आणि प्रमोशनल व्हिडिओज सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. रमेश परदेशींच्या चाहत्यांमध्ये उत्सुकतेचे वातावरण असून, २३ मे हा दिवस विशेष ठरणार आहे, कारण त्यांच्या अभिनयानं सजलेला हा अॅक्शन-थ्रिलर चित्रपट प्रेक्षकांना नवीन अनुभव देणार आहे.
अभिनेता रमेश परदेशी हे मराठी चित्रपटसृष्टीतील एक दमदार आणि बहुपरिचित नाव आहे. त्यांनी विविध भूमिकांमधून प्रेक्षकांच्या मनात आपली वेगळी छाप सोडली आहे. त्यांची कारकीर्द अॅक्शन, थ्रिलर आणि सामाजिक विषयांवर आधारित चित्रपटांमध्ये विशेषत्वाने दिसून येते. त्यांची कारकीर्द २०१४ मध्ये ‘रेगे’ या चित्रपटाने सुरू झाली. ‘मुळशी पॅटर्न’मधील ‘पिट्या भाई’ या भूमिकेने त्यांना अजूनही ओळख मिळाली. त्यानंतर ‘फत्तेशिकस्त’ (२०१९), धर्मवीर (२०२२), ‘चौक’ (२०२३), ‘सर्किट’ (२०२३) आणि ‘नवरदेव बीएससी अग्री’ यासारख्या चित्रपटांत त्यांनी वैविध्यपूर्ण भूमिका साकारल्या. ‘शातिर दि बिगिनिंग’मधील त्यांची नवी भूमिका प्रेक्षकांची उत्सुकता वाढवत आहे.
