News Information Entertainment

बांगलादेशातील हिंदूंवरील अत्याचाराविरोधात पिंपरी-चिंचवडमध्ये मूक मोर्चा; १० डिसेंबरला देशव्यापी निदर्शने आयोजित

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

वाकड : ज्या बांगलादेशात पूर्व पाकिस्तानकडून अत्याचार होत होते, तेथील मुस्लिमांची हत्या होत होती आणि महिलांवर अत्याचार होत होते, तेथील महिलांची आब्रू लुटली जात होती, त्या वेळी भारत सरकारने आपली सेना पाठवून पाकिस्तान सेनेला शरण यायला भाग पाडले व तेथील जनतेला स्वातंत्र्य मिळवून दिले.

नवीन बांगलादेशाची निर्मिती झाली. मात्र आज तेथील धर्मांध मुस्लिमांनी देशाचा ताबा घेऊन तेथील हिंदूंवर अत्याचार सुरू केले आहेत. त्यांची प्रॉपर्टी घेऊन त्यांच्या महिलांवर अत्याचार करत आहेत. जेंव्हा तेथील मुस्लिमांवर होणारे अत्याचार पाहून आपण मदत केली, मग आता तेथील हिंदूंवर होणारे अत्याचार उघड्या डोळ्याने कसे पाहू शकतो?

या प्रश्नावर लक्ष वेधण्यासाठी उत्कर्ष चौक, वाकड येथे सकल हिंदू समाज, पिंपरी-चिंचवड शहर यांनी आज, दिनांक ८ डिसेंबर २०२४ रोजी मूक मोर्चा आयोजित केला होता. आणि १० डिसेंबर २०२४ रोजी संपूर्ण भारतभर मोर्चे व निदर्शने करण्याचे नियोजित आहे.

APH Times
Author: APH Times

Leave a Comment

अधिक वाचा

Buzz4 Ai