परभणी: परभणी येथे एका मनोरुग्णाने संविधानाची तोडफोड करत सामाजिक शांततेला तडा देणारी घटना घडवली आहे. या घटनेमुळे संपूर्ण शहरात तणाव निर्माण झाला असून अनेक ठिकाणी तोडफोड व जाळपोळ झाली आहे.
ही घटना सार्वजनिक मालमत्तेच्या मोठ्या नुकसानीचे कारण बनली. अनेक वाहनांची मोडतोड झाली असून काही वाहने आगीच्या भक्ष्यस्थानी पडली आहेत. सामान्य नागरिकांच्या मालमत्तेचेही मोठे नुकसान झाले आहे.
या घटनेमुळे नागरिकांमध्ये प्रचंड संताप व्यक्त होत आहे. अशा घटनांवर वेळीच नियंत्रण आणले नाही तर समाजात अशांततेचे वातावरण निर्माण होण्याची भीती व्यक्त होत आहे. यामुळे अशा प्रकारच्या घटना रोखण्यासाठी कठोर उपाययोजना करणे गरजेचे असल्याचे मत नागरिकांमधून व्यक्त केले जात आहे.
सरकारने तातडीने स्मारके, पुतळे आणि संवैधानिक ठिकाणी कडेकोट सुरक्षा व्यवस्था उभी करावी, अशी मागणी जोर धरत आहे. भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी अधिक सजगतेची आणि कठोर कारवाईची आवश्यकता असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.
सध्या या प्रकरणाचा तपास सुरू असून प्रशासन परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी सक्रिय झाले आहे.
