News Information Entertainment

प्रारब्ध: वडील-मुलीच्या हृदयस्पर्शी नात्याची कथा यूट्यूब, हंगामा आणि एअरटेल एक्सट्रीमवर उपलब्ध!

A heart-touching Marathi film about a father and daughter’s emotional journey, now available on YouTube, Hungama & Airtel Xtreme.

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

वडील आणि मुलगी या जगातील सर्वात सुंदर आणि भावनिक नात्याचा गाभा मांडणारा प्रारब्ध हा मराठी चित्रपट आता यूट्यूब, हंगामा आणि एअरटेल एक्सट्रीमवर प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे.

प्रारब्ध या चित्रपटाची कथा भीमा आणि त्याची मुलगी मीरा यांच्या हृदयस्पर्शी नात्यावर आधारित आहे. जीवनातील आंतरिक संघर्षांवर मात करताना, व्यथेत गुरफटून जाणाऱ्या बाप-लेकीच्या संघर्षमय प्रवासाचे चित्रण या सिनेमात करण्यात आले आहे.

आता चित्रपटाच्या संपूर्ण टीमसोबतची खास मुलाखतही प्रेक्षकांना APH Times  च्या Youtube चॅनेल वर पाहता येणार आहे. या मुलाखतीत चित्रपटाच्या निर्मितीमागील प्रेरणा, कलाकारांचे अनुभव, आणि या अनोख्या कथानकाचे भावनिक क्षण उलगडले जातील.

प्रारब्ध चित्रपटाच्या माध्यमातून वडील-मुलीच्या नात्यातील जिव्हाळा आणि त्याग अनुभवण्यासाठी तयार राहा. या हृदयस्पर्शी कथेला आपल्या आवडत्या प्लॅटफॉर्मवर नक्की पाहा!

#प्रारब्ध #मराठीफिल्म #मराठीसिनेमा #YoutubeRelease #Hungama #AirtelXtreme

APH Times
Author: APH Times

Leave a Comment

अधिक वाचा

Buzz4 Ai