News Information Entertainment

धनंजय मुंडे प्रकरण: राजकीय रणसंग्राम तीव्र, मुख्यमंत्र्यांवर निर्णयाचा दबाव

Dhananjay Munde case political controversy and CM pressure

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

धनंजय मुंडे प्रकरण: राजकीय रणसंग्राम तीव्र, मुख्यमंत्र्यांवर निर्णयाचा दबाव

बीड – परळीतील गुन्हेगारी संदर्भात धनंजय मुंडे यांच्या भूमिकेबाबत बरीच चर्चा सुरू असून, विरोधकांनी त्यांच्यावर टीकेची झोड उठवली आहे. सुरेश धस, अंजली दमानिया आणि काही इतर लोकांनी धनंजय मुंडे यांच्याविरोधात पुरावे सादर करत माननीय मुख्यमंत्री आणि वरिष्ठ नेत्यांना भेटून गुन्ह्यांची माहिती दिल्याचे समजते.

या आरोपांमुळे धनंजय मुंडे यांच्यावर मोठे राजकीय आणि सामाजिक दडपण येऊ शकते, असे बोलले जात असतानाच मुंडे मात्र पूर्ण आत्मविश्वासात दिसत आहेत. त्यांनी नुकतीच भगवान गडाला भेट देऊन नामदेव शास्त्री यांचा पाठींबा मिळवत आपली ताकद दाखवली. या राजकीय शक्तीप्रदर्शनामुळे समर्थकांना संदेश देण्याचा त्यांचा प्रयत्न दिसून आला आहे.

मात्र, दुसरीकडे अजित पवार आणि मुख्यमंत्री एकमेकांवर राजकीय जबाबदारी ढकलत असल्याचे चित्र स्पष्ट होते. राजीनाम्याच्या मुद्द्यावर हे दोन्ही नेते कोणताही स्पष्ट निर्णय घेताना दिसत नाहीत. यातून एक दिसत आहे की धनंजय मुंडे यांची राजकारणातील पकड किती घट्ट आहे? त्यामुळे या प्रकरणाचा गुंता आणखी वाढण्याची शक्यता आहे.

राजकारण आणि अर्थकारण हे एकाच नाण्याच्या दोन बाजू असल्याने या संपूर्ण प्रकरणाचा प्रभाव राजकीय समीकरणांवर निश्चितच पडणार आहे. परंतु, समाजात वाढत चाललेल्या अस्वस्थतेच्या पार्श्वभूमीवर धनंजय मुंडे यांना काही काळ राजकारणापासून दूर ठेवणे हाच योग्य पर्याय असल्याचे काही राजकीय निरीक्षकांचे मत आहे. मात्र, हा निर्णय वरिष्ठ पातळीवरून घेतला जातो का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

राजकीय क्षेत्रात पुढील काही दिवसांत मोठी उलथापालथ होण्याची शक्यता असून, धनंजय मुंडे यांचे भवितव्य वरिष्ठ नेत्यांच्या निर्णयावर अवलंबून राहणार आहे.

APH Times
Author: APH Times

Leave a Comment

अधिक वाचा

Buzz4 Ai