“दृष्टी नाही तर दृष्टिकोन बदला” संकल्पनेतून SPD Entertainments ने साजरा केला Valentine’s Week!
प्रेमाचा आठवडा म्हणजेच Valentine’s Week वेगळ्या पद्धतीने साजरा करण्याचा संकल्प घेत SPD Entertainments ने एक आगळावेगळा कार्यक्रम आयोजित केला. “दृष्टी नाही तर दृष्टिकोन बदला” या संकल्पनेवर आधारित हा कार्यक्रम १४ फेब्रुवारी २०२५ रोजी, Valentine’s Day च्या निमित्ताने, कंपनीच्या कार्यालयातच एका भव्य संगीत मैफिलीच्या स्वरूपात पार पडला.
या संगीतमय संध्याकाळी रसिकांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. DIGITALZZ Group तर्फे प्रसिद्ध Karaoke Singer अमोल देशपांडे आणि त्यांचे साथीदार, तसेच सुप्रसिद्ध चित्रपट निर्माते आणि अभिनेते मुबीन मोमीन यांनी आपल्या गाण्यांनी मैफिलीला रंगत आणली.
यासोबतच, चित्रपट अभिनेते अनिल नगरकर आणि प्रसिद्ध नृत्य दिग्दर्शिका सुनीता वाघमारे यांनीही कार्यक्रमाला उपस्थिती दर्शवली. उपस्थित प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद देत कार्यक्रमाचा आस्वाद घेतला.
या कार्यक्रमाचे आयोजन कवयित्री स्नेहल दिवटे, चित्रपट लेखक आणि आयोजक आशिष जैन आणि SPD Entertainments च्या संपूर्ण टीमने केले होते. कार्यक्रमाची सुरूवात सायंकाळी ७ वाजता झाली असली तरी प्रेक्षकांच्या उत्कट सहभागामुळे आणि आनंदमय वातावरणामुळे रात्री ९ वाजेपर्यंत रंगतदार मैफिल चालूच राहिली. उपस्थित प्रत्येकाने प्रेम, स्नेह आणि संगीताचा मनमुराद आनंद लुटला.
विशेष म्हणजे, आयोजक आशिष जैन यांनी गाण्यात विशेष प्रावीण्य नसतानाही गायक मुबीन मोमीन यांच्यासोबत गाणे गाण्याचा प्रयत्न केला, यामुळे कार्यक्रमात अजूनच उत्साह संचारला.










