सकाळ समुह ग्रुप आयोजित महाराष्ट्र राज्य पुणे विभागातून यिन कला मोहोत्सवामध्ये जयक्रांती महाविद्यालयास महाविजेता संघ प्रथम क्रमांकाने घोषित करण्यात आले. यिन कला महोस्तवामध्ये सर्व मिळून २२ स्पर्धांचे आयोजन VIT College of Engineering Bibwewadi, Pune या ठिकाणी करण्यात आले होते.
या विविध स्पर्धांमध्ये जयक्रांती महाविद्यालयातील १०४ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. या कला महोत्सवामध्ये पुणे जिल्ह्यातील ६८ महाविद्यालये सहभागी झाले होते. सर्व महाविद्यालयामधून जास्तीत जास्त बक्षीसे प्राप्त होणाऱ्या महाविद्यालयाला महाविजेता म्हणून प्रथम क्रमांकाने घोषित करण्यात येते त्याचप्रमाणे जयक्रांती महाविद्यालयातील अनेक विद्यार्थ्यांना भरघोस यश मिळाले व महाविजेता संघ म्हणून घोषित करण्यात आले.
