News Information Entertainment

ठाण्यात अल्पवयीन मुलीवरील अत्याचार प्रकरणाची राष्ट्रीय महिला आयोगाकडून दखल; राज्यसरकारला चौकशीचे निर्देश

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

ठाणे | प्रतिनिधी
ठाण्यात एका अल्पवयीन मुलीच्या अपहरण, बलात्कार, गर्भपात आणि वेश्याव्यवसायात जबरदस्तीने ढकलल्याच्या धक्कादायक प्रकरणाची गंभीर दखल राष्ट्रीय महिला आयोगाने घेतली आहे. या प्रकरणी महाराष्ट्र राज्यसरकारला सखोल चौकशीचे निर्देश देण्यात आले आहेत.

माध्यमांमधून समोर आलेल्या माहितीच्या आधारे आयोगाने या प्रकरणात तातडीने हस्तक्षेप केला आहे. संबंधित आरोपीविरुद्ध पॉक्सो कायद्यानुसार तात्काळ अटक करावी, तसेच पुढील तीन दिवसांच्या आत सविस्तर कृती अहवाल आयोगास सादर करावा, असे स्पष्ट निर्देश राज्याचे पोलीस महासंचालकांना देण्यात आले आहेत.

तसेच, पीडित अल्पवयीन मुलीला तातडीने आवश्यक वैद्यकीय, मानसिक व कायदेशीर मदत देऊन तिच्या पुनर्वसनाची व्यवस्था करावी, अशीही मागणी महिला आयोगाने राज्यसरकारकडे केली आहे.

याचबरोबर, उत्तरप्रदेशातील गाझियाबादमध्ये एका महिलेस वर करण्यात आलेल्या ऍसिड हल्ल्याच्या घटनेचीही महिला आयोगाने गंभीर दखल घेतली असून, त्या प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत.

राष्ट्रीय महिला आयोगाकडून अशा घटनांविरोधात त्वरित कारवाईची मागणी होत असून, देशभरात महिला आणि मुलींच्या सुरक्षेसंबंधी वाढती चिंता पुन्हा एकदा समोर आली आहे.

APH Times
Author: APH Times

Leave a Comment

अधिक वाचा