
पुणे (मारुंजी, मुळशी):
दिनांक ८ ऑक्टोबर २०२५ रोजी वायूसेना दिनानिमित्त सेक्टर R9, लाईफ रिपब्लिक, मारुंजी येथे “भारतीय भूतपूर्व सैनिक संघ, मावळ-मुळशी तालुका” यांच्या वतीने एक विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमात वायूसैनिक, माजी सैनिक आणि त्यांच्या परिवारांचा सन्मान करण्यात आला. देशाच्या सीमांवर व विविध रणांगणांवर कार्यरत भारतीय जवानांचे योगदान आणि त्याग यांची आठवण ठेवून समाजात देशभक्तीची भावना दृढ करणे. देशाच्या सुरक्षिततेसाठी आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या वीर जवानांप्रती आदरभाव व्यक्त करण्याचा संकल्प या कार्यक्रमात करण्यात आला.

या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून सार्जंट चौधरी (निवृत्त वायूसैनिक), अमरावती, सुभेदार मेजर यशवंत महाडिक (अध्यक्ष, भूतपूर्व सैनिक संघ, पुणे जिल्हा), IESL पुणे जिल्ह्याचे पदाधिकारी ऍग्रो आयडॉल कैलासजी जाधव, तसेच R9 ORO लाईफ रिपब्लिक सोसायटीचे चेअरमन सौ. दिपालिताई आणि विनोदजी पावडे सर उपस्थित होते.

कार्यक्रमात मावळ-मुळशी परिसरातील वीर नारी, शहीदांच्या पत्नी, वीर माता-पिता, माजी सैनिक, अर्धसैनिक कर्मचारी आणि सैनिक परिवारांचा सत्कार पुष्पगुच्छ आणि ट्रॉफी देऊन करण्यात आला. या सोहळ्यात परिसरातील सर्व गौरव सेनानींनी सहकुटुंब उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली. कार्यक्रमाच्या शेवटी आयोजक मंडळाने सर्व उपस्थितांचे आभार मानत, भारतीय सैनिकांप्रती सामाजिक, मानसिक आणि नैतिक बांधिलकी जोपासण्याचे आवाहन केले.










