News Information Entertainment

संदीप बोयत यांच्या “बॉलीवूड स्टॅम्प प्रदर्शनाचे” आयोजन पुण्यातील Film and Television Institute of India

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

पुणे : भारतीय चित्रपटसृष्टीचा समृद्ध इतिहास आणि सांस्कृतिक वारसा टपाल तिकिटांच्या माध्यमातून जनतेपर्यंत पोहोचविणाऱ्या संदीप बोयत यांच्या विशेष “बॉलीवूड स्टॅम्प प्रदर्शनाचे” आयोजन पुण्यातील Film and Television Institute of India येथे दि. १५, १६ आणि १७ रोजी करण्यात आले होते. या आगळ्यावेगळ्या प्रदर्शनाला विद्यार्थी, चित्रपटप्रेमी, कला रसिक आणि नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या प्रदर्शनाचे उद्घाटन एफटीआयआयचे डायरेक्टर धीरज सिंह यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आले. यावेळी रजिस्ट्रार प्रतीक जैन, आर्ट डायरेक्टर आशुतोष कविश्वर, स्क्रीनिंग प्रोफेसर इंद्रनील भट्टाचार्य तसेच एफटीआयआय रेडिओ निवेदिका नीता तुपारे उपस्थित होत्या. संदीप बोयत यांनी भारत सरकारकडून आजपर्यंत चित्रपटसृष्टीशी संबंधित जारी करण्यात आलेल्या विविध डाक तिकिटांचा दुर्मिळ आणि ऐतिहासिक संग्रह या प्रदर्शनात मांडला होता. या संग्रहामध्ये अभिनेता, अभिनेत्री, दिग्दर्शक, निर्माता, लेखक, पटकथाकार, गीतकार, संगीतकार, गायक, गायिका तसेच भारतीय सिनेसृष्टीत मोलाचे योगदान देणाऱ्या अनेक दिग्गज व्यक्तिमत्त्वांच्या टपाल तिकिटांचा समावेश होता.  संदीप बोयत यांचे नाव त्यांच्या या अनोख्या आणि ऐतिहासिक संग्रहामुळे India Book of Records तसेच Limca Book of Records मध्ये नोंदविण्यात आले आहे. भारतीय चित्रपट वारसा जतन करून तो टपाल तिकिटांच्या माध्यमातून समाजापर्यंत पोहोचविण्याचे महत्त्वपूर्ण कार्य त्यांनी केले असल्याचे उपस्थित मान्यवरांनी सांगितले.या प्रदर्शनाला विविध क्षेत्रातील मान्यवरांनीही भेट दिली. यामध्ये वैभव वाघमारे, स्नेहल ठकार, आर. जे. संजय, इव्हेंट मॅनेजर प्रीती शर्मा, ओम नंदा, जैस्मिन भाबूर तसेच जोसेफ तेजस्वी सोनावळे  यांचा समावेश होता. मॉडेलिंग आणि चित्रपट क्षेत्राशी संबंधित अनेक मान्यवरांनी प्रदर्शनाला उपस्थित राहून संदीप बोयत यांच्या या अनोख्या उपक्रमाचे कौतुक केले.

APH Times
Author: APH Times

Leave a Comment

अधिक वाचा

Buzz4 Ai