News Information Entertainment

धनंजय मुंडे यांचं राजकीय करिअर

Dhananjay Munde’s political career and controversies—how recent events may impact his future in Maharashtra politics.

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

धनंजय मुंडे यांचं राजकीय करिअर हे महाराष्ट्राच्या राजकारणातील महत्वाच्या अध्यायांपैकी एक मानलं जातं. मात्र मास्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणामुळे त्यांच्यावर मोठं संकट आलं आहे. या प्रकरणामुळे त्यांच्या राजकीय प्रतिमेवर गंभीर परिणाम होण्याची शक्यता आहे. त्या मुळे बीडचे पालकमंत्री पद धनंजय मुंडे किंवा पंकजा मुंडे यांना न देता स्वत: अजितदादा यांनी सांभाळावे अशी मागणी जोर धरू लागली आहे.

संतोष देशमुख हत्या प्रकरणात मुंडे यांचं नाव आल्यानंतर विरोधकांनी त्यांच्यावर टीकेची झोड उठवली आहे. यामुळे त्यांच्या पक्षावरही दबाव वाढला आहे. कायदेशीर प्रक्रियेतून ते निर्दोष ठरले तरी त्यांच्या प्रतिमेला आधीच फटका बसला आहे. लोकांच्या मनात त्यांच्या प्रतिमेबद्दल संशय निर्माण होणं, ही त्यांच्या पुढील राजकीय वाटचालीसाठी अडथळा ठरू शकते.

त्यामुळे, मुंडेंच्या राजकीय भविष्यावर या प्रकरणाचा कसा आणि किती परिणाम होईल, हे येणाऱ्या काळात स्पष्ट होईल. पण सध्या त्यांच्या राजकीय प्रवासावर एक मोठं प्रश्नचिन्ह उभं राहिलं आहे, हे निश्चित.

APH Times
Author: APH Times

Leave a Comment

अधिक वाचा