News Information Entertainment

‘भावी मुख्यमंत्री जितेंद्र आव्हाड साहेब…’, ठाण्यातील बॅनरबाजी चर्चेत – News18 मराठी

A political birthday banner in Thane featuring Jitendra Awhad with the text 'Future Chief Minister Jitendra Awhad Saheb'.

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

 

ठाणे: एकीकडे राज्यात मराठा आरक्षण, खून प्रकरणे अशा गोष्टी चर्चेत असताना ठाण्यातील एका बॅनरबाजीने मात्र सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. ही बॅनरबाजी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रतोद आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यासाठी करण्यात आली.

‘भावी मुख्यमंत्री जितेंद्र आव्हाड साहेब…’

ठाण्यातील वर्दळीच्या मुलूंड चेकनाका परिसरात जितेंद्र आव्हाडांच्या वाढदिवसानिमित्त काही प्रमुख का’‘र्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी हे बॅनर लावले आहेत. यामधील एका बॅनरवर ‘भावी मुख्यमंत्री जितेंद्र आव्हाड साहेबांना वाढदिवसाच्या शुभेच्छा’ असा आशय आहे. आता खरंतर आव्हाडांचा वाढदिवस 5 ऑगस्टला आहे, त्याआधी ही बॅनरबाजी कऱण्यात आली, आणि त्यामुळे आता राजकीय चर्चांनी मात्र जोर धरला आहे.

आता ठाण्यातील बहुतांश भागात आव्हाडांच्या वाढदिवसानिमित्त जरी बॅनर लागले असले, तरी हे बॅनर मात्र लक्षवेधी ठरलं आहे. समोर आलेल्या माहितीनुसार ठाणे शहरातील पदाधिकारी सुहास दळवी आणि चेतन दळवी यांनी ही बॅनरबाजी केली असल्याचं समोर येत आहे.

Maharashtra Politics: ‘वाकड्यात जाल तर….’ उद्धव ठाकरेंचा शिंदे सरकारला इशारा!

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18Marathi वर.

Source link

APH Times
Author: APH Times

Leave a Comment

अधिक वाचा