News Information Entertainment

निगडी येथे भारतीय सेना दिवसाच्या भव्य कार्यक्रमाचे आयोजन

Grand celebration of Indian Army Day 2025 at Nigdi with cultural events, sports competitions, and tributes to brave soldiers.

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

दिनांक 13 जानेवारी2025 रोजी मदनलाल धिंग्रा ग्राउंड निगडी येथे मस्केटीयर्स युवा फाउंडेशन व भारतीय भूतपूर्व सैनिक संघ पुणे यांच्या वतीने ८ जानेवारी ते १३ जानेवारी 2025 दरम्यान भारतीय सेना दिवस साजरा करण्यासाठी भव्य कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात शाळांतील विद्यार्थी सहभाग घेतला व विविध क्रीडा आणि सांस्कृतिक उपक्रमांच्या माध्यमातून देशभक्ती आणि सामाजिक एकतेचा सन्मान करण्यात आला कार्यक्रमाचे आयोजन, ही एक सामाजिक संस्था असून, ती तरुण पिढीला प्रेरित करताना त्यांना भारतीय संरक्षण दलांविषयी जागरूक करण्याचे आणि चांगला भारतीय नागरिक होण्यासाठी मार्गदर्शन करण्याचे कार्य करते. तसेच विविध खेळांच्या स्पर्धा आणि कार्यक्रमांचे नियोजन केले रायफल शूटिंग स्पर्धा – अचूकता आणि लक्ष केंद्रित करण्याचे कौशल्य कराटे स्पर्धा – शिस्त आणि स्वसंरक्षणाची कला. तिरंदाजी स्पर्धा विशेष क्षमतेच्या विद्यार्थ्यांसाठी विशेष स्पर्धा – विशेष क्षमतेच्या विद्यार्थ्यांच्या कौशल्याला सन्मानित करण्यावर भर. अॅथलेटिक्स स्पर्धा, ज्यामध्ये: शर्यती: १०० मीटर, २०० मीटर, ४०० मीटर, ८०० मीटर आणि १५०० मीटर. मैदानी खेळ: भालाफेक, डिस्कस थ्रो, शॉट पुट, आणि लांब उडी. मुख्य कार्यक्रम: भारतीय सेना दिवस या दिवशी आयोजित होणाऱ्या कार्यक्रमाची भव्यता वीर जवानांना आदरांजली: भारतीय सैन्याच्या शौर्य व बलिदानाचा सन्मान करत वीर जवानांना पुष्पचक्र समर्पित करून श्रद्धांजली अर्पण केली शालेय विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट संचलन केले MTA संस्थे चे अध्यक्ष नरेंद्र अहिरे यांनी प्रस्थावना केली • सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आले देशभक्तीपर नृत्य, गीते आणि नाट्यसादरीकरणे यांचे सादरीकरण केले. विविध प्रात्यक्षिकांद्वारे भारतीय सैन्याचे साहस आणि कौशल्य प्रदर्शित केले. • वीरपत्नी आणि वीरमाता यांना हळदी कुमकूम व वाण देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला देशासाठी बलिदान दिलेल्या जवानांच्या कुटुंबीयांचा सन्मान करून विशेष सत्कार समारंभाचे आयोजन केले . तसेच क्रीडा, सांस्कृतिक आणि सामाजिक कार्यात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांना गौरवण्यात आले भारतीय सैन्याचे निवृत्त अधिकारी मेजर जनरल नायर साहेब व कारगिल समर सेनानी रामदास मदने यांनी विध्यार्थी उपस्थितांना संरक्षण दलांशी संबंधित जीवनाचे महत्त्व आणि शौर्य याबद्दल प्रेरणा दिली. #marathinews #news #मराठीबातम्याlive #armyday #indianarmy For all the latest news from Maharashtra keep watching APH Times on YouTube: @AphTimes

APH Times
Author: APH Times

Leave a Comment

अधिक वाचा