News Information Entertainment

गुजरात आणि बेंगळुरू: शाळकरी मुलींच्या मृत्यूने हळहळ

Child cardiac arrest cases in Gujarat and Bengaluru highlight growing health concerns among children, urging awareness and preventive measures.

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

गुजरात आणि बेंगळुरू: शाळकरी मुलींच्या मृत्यूने हळहळ

गुजरात आणि बेंगळुरूमध्ये घडलेल्या दोन हृदयद्रावक घटनांनी समाजाला हादरवून सोडले आहे. गुजरातमध्ये आठ वर्षांची मुलगी हृदयविकाराच्या झटक्यामुळे मृत्युमुखी पडली, तर बेंगळुरूमध्येही  एका तिसरीतील  शाळकरी मुलीचा हृदयविकाराने मृत्यू झाला आहे.

गुजरातमधील घटनेत, मुलगी तिच्या शाळेत आली असताना अचानक तिला अस्वस्थ वाटू लागले म्हणून ती बेंचवर बसली मात्र थोड्याच वेळात ती खाली कोसळली. तिला सी.पी.आर. देऊन तातडीने रुग्णालयात नेण्यात आले, परंतु वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तिला मृत घोषित केले. प्राथमिक तपासणीत हृदयविकाराच्या झटक्यामुळे मृत्यू झाल्याचे समोर आले आहे.

दुसरीकडे, बेंगळुरूमध्ये शाळेत असताना एक विद्यार्थिनी शिक्षिकेला अभ्यास दाखवत असताना अचानक खाली कोसळली. शिक्षक आणि सहकाऱ्यांनी तिला रुग्णालयात नेले, पण तिचाही मृत्यू झाला. या घटनेने पालकवर्गात भीतीचे वातावरण निर्माण केले आहे.

आरोग्य तज्ज्ञांच्या मते, लहान वयात हृदयविकाराचे प्रमाण वाढताना दिसत आहे. यामागील कारणांमध्ये चुकीची जीवनशैली, तणाव, अपुरी  झोप, तसेच वाढते स्क्रीन टाइम यांचा समावेश असू शकतो.

या घटनांमुळे शाळा, पालक, आणि आरोग्य यंत्रणांनी मुलांच्या आरोग्याबाबत अधिक सतर्क राहण्याची गरज आहे. तसेच, नियमित आरोग्य तपासणी व तणावमुक्त जीवनशैलीकडे अधिक लक्ष देण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

APH Times
Author: APH Times

Leave a Comment

अधिक वाचा