News Information Entertainment

भारतीय संविधान आणि प्रेम बिहारी नारायण रायजादा यांची कहाणी

Prem Bihari Narayan Raizada, the calligrapher who handwrote the Indian Constitution, preserving its artistic and historical significance.

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

भारतीय संविधान आणि प्रेम बिहारी नारायण रायजादा यांची कहाणी

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली भारतीय संविधानाची रचना झाली. संविधान लिहिण्यासाठी अनेक विद्वानांनी योगदान दिले. परंतु संविधानाचे अंतिम स्वरूप तयार करताना हस्तलिखित स्वरूपात त्याची निर्मिती झाली. हे महत्त्वाचे काम प्रेम बिहारी नारायण रायजादा यांनी केले, जे उत्तम हस्ताक्षरासाठी ओळखले जात होते.

प्रेम बिहारी हे उत्तम इंग्रजी कॅलिग्राफर होते. त्यांना भारतीय संविधान हस्तलिखित स्वरूपात तयार करण्याची जबाबदारी देण्यात आली. त्यांनी संविधानाचा प्रत्येक शब्द अत्यंत शिस्तबद्ध आणि सुंदर पद्धतीने लिहिला. या कामासाठी त्यांनी ६ महिने मेहनत घेतली व ४३२ निब वापरल्या. त्यांनी या कामासाठी कोणतेही मानधन घेण्यास नकार दिला. परंतु त्यांनी एकच अट ठेवली – संविधानाच्या प्रत्येक पानावर त्यांचे नाव कोरले जावे. त्यांच्या कलेमुळे भारतीय संविधान केवळ कायद्याचा दस्तऐवजच नाही, तर एक कलात्मक ठेवा म्हणूनही ओळखले जाते.

संविधान तयार करण्यासाठी घटना सभेला तब्बल २ वर्षे, ११ महिने आणि १८ दिवस लागले. २४ जानेवारी १९५० रोजी या हस्तलिखित संविधानावर घटना सभेच्या २८४ सदस्यांनी स्वाक्षऱ्या केल्या, दोन दिवसांनंतर म्हणजे २६ जानेवारी १९५० रोजी संविधान लागू करण्यात आले.

ही हस्तलिखिते केवळ कायद्याचा दस्तऐवज नसून, ती एक ऐतिहासिक आणि सांस्कृतिक कलाकृती देखील आहेत, जी भारताच्या लोकशाही मूल्यांची साक्ष देतात.

प्रेम बिहारी नारायण रायजादा यांचे कार्य इतिहासाच्या पानांमध्ये सोनेरी अक्षरांनी लिहिले गेले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी जे योगदान दिले, ते भारतीय लोकशाहीच्या अभूतपूर्व यशाचा एक भाग आहे.

 

APH Times
Author: APH Times

Leave a Comment

अधिक वाचा