News Information Entertainment

कनिष्का वीरा किड्स डान्स फ्युजन 2025 व इंडिया किड्स अवॉर्ड्स चिंचवड येथे मोठ्या उत्साहात संपन्न

Kanishka Veera Kids Dance Fusion 2025 winners and performances

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

कनिष्का वीरा किड्स डान्स फ्युजन 2025 व इंडिया किड्स अवॉर्ड्स चिंचवड येथे मोठ्या उत्साहात संपन्न

चिंचवड – शोभा मिडिया अँड प्रायव्हेट लिमिटेड व वीरा नृत्य वर्ल्ड डान्स स्टुडिओ यांच्या संयुक्त विद्यमाने कनिष्का वीरा किड्स डान्स फ्युजन 2025 व इंडिया किड्स अवॉर्ड्स मोठ्या थाटात चिंचवड येथे साजरे करण्यात आले. या भव्य स्पर्धेचे आयोजक महेश गायकवाड, प्रदीप बनसोडे सर आणि वीरा डान्स अकॅडमीची टीम होती.

ही स्पर्धा 19 जानेवारी रोजी एलप्रो सिटी स्क्वेअर चिंचवड मॉल येथे संपन्न झाली. यामध्ये 3 वर्षांपासून ते 18 वर्षांपर्यंतच्या विद्यार्थ्यांनी भाग घेतला होता. विविध शहरांमधून आलेल्या 300 हून अधिक विद्यार्थ्यांनी अप्रतिम नृत्य सादर केले. स्पर्धकांना ट्रॉफी, सर्टिफिकेट, मेडल आणि नाश्त्याचे वाटप करण्यात आले. विजेत्यांना मोठी ट्रॉफी व रोख बक्षीस प्रदान करण्यात आले.

प्रत्येक वयोगटातील प्रथम क्रमांक विजेते पुढीलप्रमाणे आहेत: चार्वी चारकोल, अजिंक्य डेरे, विशेष चांडक, निधी कुलकर्णी, आंचल कलात्रे आणि आराध्या कदम. ग्रुप डान्स विजेते नटराज डान्स अकॅडमी, गौरव डान्स अकॅडमी आणि ड्रीम डान्स अकॅडमी ठरले.

या भव्य सोहळ्याला अनेक मान्यवरांनी हजेरी लावली. प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. प्रवीण भोळे (विभागप्रमुख, ललितकला केंद्र), अतुल गुंजाळ, समीर खोत, अभिनेते राहुल रेड्डी, प्रसिद्ध मेकअप आर्टिस्ट वैशाली गोळे, नितीन झगरे आणि ज्ञानेश्वर चव्हाण यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रेडिओ जॉकी प्रशांत गाडेकर यांनी केले, तर कार्यक्रमाचे फोटोग्राफर ऋषी पाटील होते. सुरक्षा व्यवस्थेसाठी एक्स बाऊन्सर विजय गायकवाड उपस्थित होते.

स्पर्धेदरम्यान इंडिया किड्स अवॉर्ड्स 50 हून अधिक विद्यार्थ्यांना प्रदान करण्यात आले. या स्पर्धेत काही रिल स्टार, नावाजलेले नृत्य कलाकार, मॉडेल्स आणि खेळाडूंचा सहभाग होता. सर्व विद्यार्थ्यांना उत्तम स्टेज उपलब्ध करून देणे आणि भविष्यात अनेक उत्कृष्ट विद्यार्थी घडवणे हे वीरा अकॅडमी व शोभा शॉपिंगचे मुख्य उद्दिष्ट आहे. कान्हा दिप्त्ती पाटील (वय वर्ष सहा) या बाल कलाकाराने विजेत्यांच्या वतीने आयोजकांचे आभार मानले.

या उत्साही कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनानंतर आयोजकांनी आगामी सीजन 4 लवकरच घेऊन येण्याची घोषणा केली. या भव्य कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांना एक अनोखा मंच मिळाला असून, त्यांच्या कला गुणांना वाव मिळाला आहे.

APH Times
Author: APH Times

Leave a Comment

अधिक वाचा