ब्रेकिंग न्यूज: चिखली परिसरातील महादेव मंदिराजवळील प्लास्टिक कारखान्यात भीषण आग!
पिंपरी दि. ८ – येथील महादेव मंदिरा शेजारी असलेल्या प्लास्टिक कारखान्याला आज सकाळी भीषण आग लागली आहे. या आगीमुळे आजूबाजूच्या झोपडपट्टीला तसेच इतर इमारतींना मोठा धोका निर्माण झाला आहे. अग्निशमन दलाची पथके घटनास्थळी दाखल झाली असून आग विझवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
आगीचे निश्चित कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. परिसरात मोठ्या प्रमाणावर धूर पसरला असून नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात येत आहे. पुढील तपास सुरू आहे.
