मेघराज राजेभोसले फाउंडेशनच्या वतीने आणि सूर्यदत्त प्रॉडक्शन हाऊस व उर्विता प्रॉडक्शन यांच्या सहकार्याने मराठी चित्रपट निर्मात्यांसाठी एक दिवसीय मार्गदर्शक कार्यशाळा ‘निर्मिती संवाद’ आयोजित करण्यात आली आहे. ही कार्यशाळा रविवार, दि. १० नोव्हेंबर २०२४ रोजी सकाळी १०.०० ते सायंकाळी ६.०० या वेळेत सूर्यदत्त ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स, बावधन, पुणे येथे होणार आहे.
प्रसिद्ध अभिनेते, दिग्दर्शक आणि निर्माते मा. श्री. सचिन पिळगांवकर यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली या कार्यशाळेत चित्रपट निर्मिती क्षेत्रातील नामवंत व्यक्ती सहभागी होणार आहेत. यात नितीन वैद्य (निर्माते, मुंबई), आदित्य सरपोतदार (दिग्दर्शक), आदिनाथ कोठारे (अभिनेता/दिग्दर्शक), कांचन अधिकारी (अभिनेत्री/निर्माती), तेजस्विनी पंडित (अभिनेत्री/निर्माती), उपेंद्र सिधये, राज काझी (लेखक/दिग्दर्शक), संजय दावरा, किरण यज्ञोपवीत, प्राजक्ता माळी (अभिनेत्री/निर्माती) आदी मान्यवरांचा समावेश आहे.
कार्यशाळेत सहभाग विनामूल्य असून अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ नोंदणीकृत निर्मात्यांसाठीच खुली आहे. यामध्ये भोजन व इतर सोयींचा समावेश आहे. अधिक माहितीसाठी योगेश जोशी (7507112776) यांच्याशी संपर्क साधावा.
कार्यशाळेत सहभागी होऊन मराठी चित्रपट निर्मितीचे तंत्र, प्रचलित ट्रेंड्स आणि यशस्वी निर्मितीच्या महत्त्वाच्या पैलूंवर मार्गदर्शन मिळणार आहे.










