समाज प्रबोधनासाठी ‘राजगती’ नाटकाचा विशेष प्रयोग
पुणे : प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी नाट्यप्रयोग सातत्याने होत असतात आणि रसिक प्रेक्षक त्यांना भरभरून प्रतिसाद देतात. मात्र, समाज प्रबोधनाच्या दृष्टीने नाटकाचे प्रयोग कमी प्रमाणात सादर होताना दिसतात. या व्यावसायिक नाट्यसृष्टीत काही ध्येयवेडे कलाकार समाजात जागृती निर्माण करण्यासाठी वेगळे प्रयोग करत आहेत आणि त्यांना चांगला प्रतिसादही मिळत आहे.
‘थिएटर ऑफ रेलेव्हन्स’ या लेखक आणि दिग्दर्शक मंजुल भारद्वाज यांच्या संस्थेतर्फे ‘राजगती’ हे मराठी नाटक पुण्यात सादर होणार आहे. शनिवार, १ मार्च २०२५ रोजी सायंकाळी ५.३० वाजता भारतरत्न पंडित भीमसेन जोशी कलामंदिर, औंध येथे या नाटकाचा प्रयोग रंगणार आहे.
‘माझा राजकारणाशी काय संबंध?’ या सर्वसामान्य नागरिकांच्या मानसिकतेला छेद देत, ‘मीच राजकारणाचा घटक आहे’ हा विचार प्रभावीपणे मांडून समाजजागृती घडवण्याचा प्रयत्न या नाटकाच्या टीमकडून केला जात आहे. हा अनोखा, परंतु प्रशंसनीय प्रयोग अनुभवण्यासाठी नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात येत आहे.
कलाकार : अश्विनी नांदेडकर, सायली पावसकर, कोमल खामकर, तुषार म्हस्के, प्रियांका कांबळे, नृपाली जोशी, तनिष्का लोंढे, आरोही आणि अन्य सहकलाकार.
प्रवेशिका : थिएटरवर उपलब्ध.
संपर्क : ९८२०३ ९१८५९ | etftor@gmail.com
