News Information Entertainment

१५ व्या विधानसभेच्या मुख्यमंत्रीपदाची माळ देवेंद्र फडणवीस यांच्या गळ्यात

Devendra Fadnavis addressing the public after being re-elected as Maharashtra CM.

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

१५ व्या विधानसभेच्या मुख्यमंत्रीपदाची माळ देवेंद्र फडणवीस यांच्या गळ्यात

महाराष्ट्राच्या १५ व्या विधानसभेसाठी मुख्यमंत्रीपदाची धुरा पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. संयमी नेता आणि कुशल प्रशासक अशी ओळख असलेल्या फडणवीस यांनी २०२४ च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत सूक्ष्म नियोजन आणि सहकारी पक्षांच्या मदतीने अभूतपूर्व विजय मिळवला. या विजयानंतर दिल्लीतील हायकमांडसमोर दुसरा पर्याय शिल्लकच राहिला नाही.

पक्षातील सर्व आमदारांचा पाठींबा मिळाल्यामुळे फडणवीस यांचे मुख्यमंत्रीपद निश्चित झाले. पक्षाचे एकमत आणि नेत्यांवरील विश्वास ही त्यांच्या निवडीमागील प्रमुख कारणे ठरली आहेत. “मी पुन्हा येईल” असे आत्मविश्वासाने केलेले विधान फडणवीस यांनी प्रत्यक्षात आणले आहे.

फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील नव्या सरकारकडून राज्याच्या विकासाला नवा वेग मिळण्याची अपेक्षा सर्वसामान्य जनतेसह राजकीय वर्तुळात व्यक्त होत आहे. महाराष्ट्राच्या राजकारणातील हा टप्पा अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे.

 

APH Times
Author: APH Times

Leave a Comment

अधिक वाचा

Buzz4 Ai