News Information Entertainment

नवीन गाणं ‘मेरी दादी’ रसिकांच्या भेटीला

A heartfelt moment from the song 'Meri Dadi,' featuring emotional performances by the cast.

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

कालच “मेरी दादी” हे गाणं B You Productions या युट्यूब चॅनेल वर रिलीज करण्यात आलं.  या गाण्याला हर्ष उपाध्याय यांनी संगीतबद्ध केले असून, सेनजुती दास आणि जितुल बोरो यांनी गायलं आहे.

फरीदा दादी, कशिश नारंग आणि अभिषेक मिश्रा यांनी गाण्याला भावनिक रंगत दिली असून अप्रतिम अभिनय केला आहे.

या गाण्याची निर्मिती तेजल पिंपळे यांनी केली असून, गाण्याचे लेखन आणि दिग्दर्शन विष्वेश्वर विलास चव्हाण यांनी केले आहे. मानसी चव्हाण यांनी क्रिएटिव्ह डायरेक्टर आणि स्टायलिस्ट म्हणून मोलाची भूमिका बजावली आहे.

छायाचित्रणाची जबाबदारी जितेश राठोड यांनी सांभाळली असून, एडिटिंगची जबाबदारी प्रज्ञा श्रीमंत पाटील यांनी पार पाडली आहे.

पोस्ट प्रॉडक्शनचे काम APH Studio, Pune येथे पूर्ण झाले आहे, तसेच डी. आय. कृष्णा सोनार आणि सायन चक्रवर्ती (Cinex Film Studio, पुणे) यांनी केली आहे.

गाण्यातील प्रत्येक घटकाची जुळवाजुळव उत्तमरीत्या करण्यात आली आहे. विशेषत: फरीदा दादी यांच्या भावनिक अभिनयाने गाण्याला एक वेगळी उंची दिली आहे. या गाण्यात आजी-नातवंडांच्या नात्याचा हळुवार प्रवास मांडण्यात आला आहे.

‘मेरी दादी हे गाणं प्रेक्षकांसाठी भावनिक आठवणींचा नजराणा ठरतोय. यूट्यूबसह विविध डिजिटल प्लॅटफॉर्म्सवर हे गाणं उपलब्ध आहे.

APH Times
Author: APH Times

Leave a Comment

अधिक वाचा

Buzz4 Ai