News Information Entertainment

माननीय एकनाथ शिंदे मंत्रिमंडळात सहभागी होणार का? अर्थातच हो

Eknath Shinde's political journey and his potential participation in the Maharashtra cabinet

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

माननीय एकनाथ शिंदे मंत्रिमंडळात सहभागी होणार का? अर्थातच हो

युतीच्या भरघोस यशानंतर आणि भाजपच्या घवघवीत विजयाने महाराष्ट्राच्या राजकारणाला नवीन वळण मिळाले. या निकालांमुळे सर्वसामान्य जनता, विरोधी पक्ष आणि सत्ताधारी गट यांना स्पष्टपणे समजले की मुख्यमंत्री पदाची माळ आता मा. देवेंद्र फडणवीस यांच्या गळ्यात पडणार आहे. त्यांच्या कार्यक्षमतेबद्दल आणि राजकीय चातुर्याबद्दल राज्यातील जनतेचा आणि भाजपच्या नेतृत्वाचा ठाम विश्वास आहे.

याच वेळी, एकनाथ शिंदे गटाकडून आणि त्यांच्या समर्थकांकडून शिंदे साहेबांना पुन्हा मुख्यमंत्री करण्याचा आग्रह सुरु झाला. मात्र, स्वतः शिंदे साहेबांना ही जाणीव होती की आता फडणवीस यांना संधी दिली जाईल, आणि ती योग्यही ठरेल. या परिस्थितीत, मा. एकनाथ शिंदे यांनी मंत्रिमंडळात सहभागी होण्याबाबत थोडी प्रतीक्षा करण्याचा निर्णय घेतला.

मात्र, त्यांचा हा निर्णय तात्कालिक असावा. कारण, जर ते मंत्रिमंडळात सहभागी झाले नाहीत, तर शिवसेना (शिंदे गट) आमदारांची बाजू मांडण्यासाठी एक सक्षम नेतृत्वाची उणीव भासू शकते. शिवाय, शिंदे गटाचा राजकीय प्रभाव टिकवून ठेवण्यासाठी त्यांची मंत्रिमंडळातील उपस्थिती अत्यावश्यक आहे. “कॅप्टनला शिप सोडून जाता येत नाही” हा विचार शिंदे साहेबांना जाणवतो, आणि म्हणूनच, त्यांच्या समर्थकांमध्ये चिंता नसावी.

राजकीय गरजा आणि भावनिक समज यांचा समतोल साधून, एकनाथ शिंदे साहेब मंत्रिमंडळात सहभागी होण्याचा निर्णय घेतील. उशिरा का होईना, परंतु त्यांची भूमिका निश्चितच महाराष्ट्राच्या राजकारणाला सकारात्मक दिशा देणारी ठरेल. शिवसेनेच्या अस्तित्वासाठी आणि त्यांच्या समर्थकांच्या अपेक्षांसाठी, त्यांचे मंत्रिमंडळात असणे अनिवार्य आहे.

अजित दादा यांना आपली कुवत आणि ताकत दोन्हीही ठाऊक आहे. त्यामुळे ते उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत.

सामाजिक आणि राजकीय दृष्टिकोनातून पाहता, शिंदे साहेबांच्या सहभागामुळे युती अधिक मजबूत होईल. त्यांचा निर्णय केवळ त्यांच्या गटाचा नव्हे तर राज्याच्या राजकारणाचा भविष्य ठरवणारा ठरेल.

APH Times
Author: APH Times

Leave a Comment

अधिक वाचा

Buzz4 Ai