News Information Entertainment

ॲडव्होकेट प्रविणकुमार विठ्ठलराव सुतार यांचा आम आदमी पार्टीत अधिकृत प्रवेश

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

पुणे – दिनांक 13 सप्टेंबर 2025 रोजी शिवाजीनगर येथे झालेल्या एका औपचारिक कार्यक्रमात ॲडव्होकेट प्रविणकुमार विठ्ठलराव सुतार यांनी आम आदमी पार्टीत प्रवेश केला. या प्रसंगी आम आदमी पार्टी महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष श्री. अजित फाटके पाटील व प्रदेश सचिव श्री. अभिजित मोरे यांची उपस्थिती होती. मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांनी या कार्यक्रमाला हजेरी लावली.

पक्ष प्रवेशाच्या वेळी ॲडव्होकेट सुतार यांनी आपले राजकीय विचार स्पष्ट करताना सांगितले की, राजकारण हे जनतेच्या प्रश्नांवर उपाय शोधण्यासाठी असते, वैयक्तिक स्वार्थासाठी नव्हे. आम आदमी पार्टी ही जनतेच्या समस्या प्रत्यक्ष जाणून त्यावर काम करणारी ताकद आहे, म्हणूनच मी हा पक्ष निवडला.

त्यांनी पुढे असेही स्पष्ट केले की, पारदर्शकता, प्रामाणिकपणा व जनसामान्यांच्या प्रश्नांसाठी सातत्याने लढण्याची भूमिका हेच आम आदमी पक्षाचे बलस्थान आहे आणि याच भूमिकेमुळे ते पक्षात सामील झाले.

या प्रवेशामुळे पुणे विभागात आम आदमी पार्टीची ताकद वाढेल, असा विश्वास प्रदेशाध्यक्ष अजित फाटके पाटील यांनी व्यक्त केला. त्यांनी सांगितले की, सुतार यांचा अनुभव कायद्याविषयीचे ज्ञान हे पक्षासाठी मार्गदर्शक ठरेल. त्यांच्या नेतृत्वामुळे पक्षाची पकड अधिक बळकट होईल.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक व समारोप स्थानिक कार्यकर्त्यांनी केला. उत्साही वातावरणात झालेल्या या कार्यक्रमानंतर उपस्थित कार्यकर्त्यांनी नवीन ऊर्जेसह आगामी राजकीय लढतीस सज्ज असल्याचा निर्धार व्यक्त केला.

APH Times
Author: APH Times

Leave a Comment

अधिक वाचा

Buzz4 Ai