News Information Entertainment

काळाखडक, वाकड येथील स. नं. १२४/१ ४३ मधील झोपड्यांवर अतिक्रमण विभागाची कारवाई

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

पिंपरी, ११ सप्टेंबर २०२५ : पिंपरी चिंचवड महापालिकेच्या झोपडपट्टी निर्मूलन व पुनर्वसन विभागाने विकास आराखड्यात आरक्षित असलेल्या १८ मीटर रस्त्यावरील ४३ झोपड्यांचे सुमारे ३८ हजार ७५० चौरस फुटांवरील बांधकाम निष्कासित केले.

पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह, अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील, शहर अभियंता मकरंद निकम यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच झोपडपट्टी निर्मूलन व पुनर्वसन विभागाचे उपायुक्त अण्णा बोदडे, मुख्यालय अतिक्रमण विभागाचे सहाय्यक आयुक्त अतुल पाटील यांच्या अधिपत्याखाली करण्यात आलेल्या या कारवाईत कार्यकारी अभियंता सुनिल शिंदे,राजेंद्र शिंदे यांच्यासह अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले होते.

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने काळाखडक, वाकड येथील स. नं. १२४/१ या मिळकतीवरील झोपडपट्टी पुनर्वसन योजनेस लागून असलेल्या मंजूर विकास योजनेतील भूमकर चौक, वाकड येथील ताथवडे हद्दपर्यंत १८ मी. रस्त्याने बाधित होणाऱ्या २०० मीटर लांब व १८ मीटर रुंद असलेल्या सुमारे ३८ हजार ७५० चौरस फूट क्षेत्रामध्ये ४३ झोपड्या निष्कासित करण्यात आल्या. ड क्षेत्रीय कार्यालय स्थापत्य, झोपडपट्टी निर्मूलन व पुनर्वसन विभाग, प्रशासन व स्थापत्य, शहरी दळणवळण विभाग, नगररचना विभाग, विद्युत विभाग, अतिक्रमण विभाग, अग्निशामक व महाराष्ट्र सुरक्षा बलाचे जवान यांनी संयुक्तपणे ही कारवाई करण्यात आली. या कारवाईमध्ये सदर रस्ता रुंदीकरणातील अनधिकृत झोपड्या/वीट बांधकाम ड क्षेत्रीय कार्यालय स्थापत्य विभागाच्या ४ पोकलेन्ड, ४ जेसीबी, ६ डंपर व २० मजुरांच्या सहाय्याने निष्कासित करण्यात आले.

APH Times
Author: APH Times

Leave a Comment

अधिक वाचा

Buzz4 Ai